१०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल
अ.क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण/अपूर्ण | पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/फोटो/ अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास सद्य:स्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा |
---|---|---|---|---|
1 | महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सुधारीत आकृतीबंध मंजूर करणे. | पूर्ण |
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सुधारीत आकृतीबंध शासन निर्णय क्र.आस्थाप-2024/प्र.क्र.101/आस्थापना, दि.29.01.2025 अन्वये मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा आकृतीबंध मंजूर करणे शासन निर्णय [पीडीएफ 785 केबी] |
लागू नाही. |
2 |
पाणथळ जागा (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, 2017 अंतर्गत सर्वेक्षण केलेल्या 564 पाणथळ जागांपैकी 100 पाणथळ जागांचे ब्रीफ डॉक्युमेंट तयार करणे. |
पूर्ण |
|
लागू नाही. |
3 |
महाराष्ट्रातील निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी एसटीपी च्या कार्यक्षमता वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीवर परिषद आयोजित करणे. |
पूर्ण |
|
लागू नाही. |
4 |
सर्क्युलर इकॉनॉमी विषयी जिल्हानिहाय अहवाल (निर्देशिका) तयार करणे |
पूर्ण |
या निर्देशिकेत खालील माहिती आहे :
|
लागू नाही. |
5 |
पर्यावरणीय अर्थशास्त्र संदर्भात कौशल्य आत्मसात करण्यासाठी राज्यातील शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद, उद्योगांशी संबंधीत कामगार/तंत्रज्ञ, पर्यावरण क्षेत्रासंबंधीत मनुष्यबळ यांचे म.प्र.नि. मंडळामार्फत प्रशिक्षण आयोजित करणे. |
पूर्ण |
|
लागू नाही. |
6 |
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातील भरती प्रक्रिया सुरू करणे |
अपूर्ण |
मंडळाचे सेवाप्रवेश नियमास मा. मंत्री महोदयांची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुषंगाने मंडळास कळविण्यात येत आहे. मंडळाकडून दि.15 ऑक्टोबर, 2025 पर्यत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. |
|
7 |
हरित महाराष्ट्र कार्यक्रमास मा.मंत्रिमंडळाची मान्यता घेवून कार्यक्रम सुरू करणे. |
अपूर्ण |
सदर प्रस्तावावर रोजगार हमी योजना विभागाने हरित महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याबावत असमर्थता व्यक्त केली असल्यामुळे सदर मुद्दा १०० दिवसांच्या कार्यक्रमातून वगळण्याबाबत मा. मुख्यमंत्री सचिवालयास विनंती करण्यात येत आहे. |
|
8 |
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत पुढील 100 दिवसांत किमान 25 नविन तलाव संवर्धन प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देणे तसेच संबंधितांना निधी वितरीत करणे. |
अपूर्ण |
सुकाणू समितीने शिफारस केलेल्या एकूण २७ तलाव प्रस्तावांची नस्ती मान्यतेसाठी मा.मंत्री (पर्यावरण व वातावरणीय बदल) यांच्याकडे मान्यतेस्तव सादर करण्यात आली होती. सदर २७ प्रस्ताव सुकाणू समितीसमोर पुनःश्च सादर करून मान्यतेस्तव सादर करण्याचे मा. मंत्री (पर्यावरण व वातावरणीय बदल) महोदया यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर प्रस्ताव सुकाणू समितीसमोर मांडण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे. |
तलाव संवर्धनाचे प्रस्ताव सुकाणू समितीसमोर पुनःश्च सादर करण्याचे मा.मंत्री (पर्यावरण व वातावरणीय बदल) महोदया यांचे निर्देश आहेत. त्यानुसार सदर प्रस्ताव सुकाणू समितीसमोर सप्टेंबर, 2025 पर्यंत मांडण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे. |
9 |
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मागील वर्षामध्ये बक्षिस मिळविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या पर्यावरण पूरक कामांमुळे झालेल्या परिणामांचे मूल्यांकन व परिक्षण करणे |
पूर्ण |
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मागील वर्षामध्ये बक्षिस मिळविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या पर्यावरण पूरक कामांमुळे झालेल्या परिणामांचे मूल्यांकन व परिक्षण करण्यासाठी त्रयस्त यंत्रणेची नियुक्ती करण्याबाबतचे आदेश दिनांक 31 जुलै, 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. (प्रत सोबत जोडली आहे) |
पूर्ण |
10 |
सि.आर.झेड अधिसुचना, 2019 अंतर्गत 1:4000 प्रमाणात सि.आर.झेड नकाशे एन.सी.एस.सी.एम, चेन्नई या संस्थेकडुन तयार करणे व केंद्र शासनास सादर करणे |
पूर्ण |
पर्यावरण विभागाच्या दि.30/4/2025 च्या ई-मेल अन्वये केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला आहे. |
लागू नाही. |
11 |
महाराष्ट्रातील साखर कारखाने व आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्पांमधील पर्यावरण अधिकारी/आसवणी व्यवस्थापकांसाठी परिषद आयोजित करणे. |
अपूर्ण |
दि.8 सप्टेंबर, 2025 मध्ये सदर परिषद प्रस्तावित आहे. |
|
12 |
राज्यातील विभागीय वातावरणीय कृती कक्षांना पर्यावरण रिसोर्स सेल म्हणून जबाबदारी देणे. |
पूर्ण |
पर्यावरण रिसोर्स सेल म्हणून जबाबदारी देण्याबाबत शासन निर्णय [पीडीएफ 161 केबी] |
लागू नाही |
13 |
राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर दहा ठिकाणी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची सतत तपासणी (रिअल टाइम मॉनिटरिंग) करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणा उभारणे. |
अपूर्ण |
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (आर्थिक बोली 01.09.2025 पूर्वी उघडली जाईल आणि निवडलेल्या पक्षाला 03.09.2025 पूर्वी कार्यादेश निर्गमित केला जाईल.) |
|
14 |
पर्यावरण विषयक तक्रार नोंदविणे, संबंधितांनी त्यावर कार्यवाही करणे व सदर तक्रारीचे निराकरण करणे यानुषंगाने महापर्यावरण ॲप तयार करणे. |
पूर्ण |
निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. महापर्यावरण ॲप तयार झाले आहे व दि.05 जून, 2025 पासून नागरिकांच्या वापरासाठी सुरु करण्यात आले आहे. महापर्यावरण ॲप :- महापर्यावरण ॲपच्या अंमलबजावणी आणि देखभालीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. निवडलेल्या बोलीदाराला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. या ॲपमध्ये नागरिक प्रदूषण झालेल्या ठिकाणचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा असेल हे ॲप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला महाराष्ट्रातील पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी संबंधित नागरिकांशी सहकार्य करण्यास सक्षम करेल व नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण जलद गतीने होईल. परिणामी प्रदूषण नियंत्रित करण्यास मदतच होईल. |
पूर्ण |
15 |
केंद्राच्या कार्बन क्रेडिट धोरणाची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष (कार्बन मार्केट फॅसिलिटेशन डेस्क) गठित करणे. |
पूर्ण |
कार्बन क्रेडिट बाबतच्या राष्ट्रीय धोरणाची राज्यामध्ये सुलभ अंमलबजावणी करण्यासाठी राज्य वातावरणीय कृती कक्षांतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभगाच्या अधीनस्त ‘कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष (कार्बन मार्केट फॅसिलिटेशन डेस्क) स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कार्बन क्रेडिट बाजाराबाबत जनजागृती करण्यासाठी संबंधित घटकांना कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीमचा लाभ मिळण्याकरीता आवश्यक ती माहिती प्रदान करण्यासाठी, विहित कार्यपद्धती व प्रक्रियांचे अनुपालन करण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणारे प्रकल्प शोधून त्यांना मदत करण्यासाठी कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष काम करेल. कक्षामार्फत राष्ट्रीय धोरणावर आधारित एक तपशीलवार कार्यप्रणाली (मानक कार्यप्रणाली) बनविण्यात येईल. शासन निर्णय क्रमांक: रावाकृ-2025/प्र.क्र.11/ता.क.1, दि.30/4/2025 कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष तयार करण्याबाबत शासन निर्णय [पीडीएफ 557 केबी] |
लागू नाही. |
16 |
“नमामि चंद्रभागा” अभियान अंतर्गत नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विषयक अन्य महत्वाच्या बाबींना शासनाची मंजूरी घेणे. |
पूर्ण |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रभागा नदीचा प्रदुषित पट्टयांच्या अनुषंगाने कृति आराखडा (कृती आराखडा) तयार करुन शासनास सादर केला आहे. सदर कृती आराखड्यास शासनाची मान्यता घेऊन सदर कृती आराखड्यानुसार संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय क्र.इएनव्ही-2025/प्र.क्र.32/(1)/तां.क.3, दि.30/04/2025 नुसार निर्देश देण्यात आले आहेत. नमामि चंद्रभागा नदी कृती आराखडा मान्यता शासन निर्णय [पीडीएफ 1एमबी] |
लागू नाही. |
17 |
आगामी कुंभमेळ्याचे लक्ष्य साधून “नमामि गोदावरी” अभियानाच्या अनुषंगाने नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमासोबतच पर्यावरण विषयक अन्य महत्वाच्या बाबींना शासनाची मंजूरी घेणे. |
पूर्ण |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रभागा नदीचा प्रदुषित पट्टयांच्या अनुषंगाने कृति आराखडा (कृती आराखडा) तयार करुन शासनास सादर केला आहे. सदर कृती आराखड्यास शासनाची मान्यता घेऊन सदर कृती आराखड्यानुसार संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय क्र.इएनव्ही-2025/प्र.क्र.32/(1)/तां.क.3, दि.30/04/2025 नुसार निर्देश देण्यात आले आहेत. नमामि गोदावरी नदी कृती आराखडा मान्यता शासन निर्णय [पीडीएफ 1एमबी] |
लागू नाही. |
18 |
नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून “नमामि पंचगंगा” कार्यक्रम सुरू करण्यात येवून त्याची अंमलबजावणी करण्याकरिता पर्यावरण विषयक महत्वाच्या बाबीं समाविष्ट करून आराखडा बनविणे व त्यास शासनाची मंजूरी घेणे. |
पूर्ण |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रभागा नदीचा प्रदुषित पट्टयांच्या अनुषंगाने कृति आराखडा (कृती आराखडा) तयार करुन शासनास सादर केला आहे. सदर कृती आराखड्यास शासनाची मान्यता घेऊन सदर कृती आराखड्यानुसार संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग शासन निर्णय क्र.इएनव्ही-2025/प्र.क्र.32/(३)/तां.क.3, दि.30/04/2025 नुसार निर्देश देण्यात आले आहेत. नमामि पंचगंगा नदी कृती आराखडा मान्यता शासन निर्णय [पीडीएफ 1.2 एमबी] |
लागू नाही. |
19 |
मेढा-निवती, ता.वेर्गुला, जि.सिंधुदुर्ग तसेच इतर 4 समुद्रकिनारे (काशिद-रायगड, डहाणू-पालधर, श्रीवर्धन-रायगड, गुहागर-रत्नागिरी) याचा समावेश करण्यात येवून समुद्रकिनारा निल ध्वज मानांकन बाबतचा प्रस्ताव तयार करणे व केंद्र शासनास सादर करणे. |
पूर्ण |
पर्यावरण विभागाच्या दि.28/4/2025 च्या ई-मेल अन्वये केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला आहे. |
लागू नाही. |
20 |
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामे, कामकाज, परवानग्या इ. बाबत डेटाबेस च्या अनुषंगाने विश्लेषणात्मक/निरीक्षण आणि मूल्यांकन प्लॅटफॉर्म तयार करणे. |
पूर्ण |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फ़त राबविण्यात येणा-या योजना, कामे,कामकाज,परवानग्या, इ.बाबत डेटाबेस च्या अनुषंगाने विश्लेषणात्मक/निरीक्षण आणि मूल्यांकन प्लॅटफॉर्म महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित तयार करण्यात आलेला आहे. |
|
एकूण | एकूण संख्या-20 | एकूण पूर्ण कामांची संख्या-15 | एकूण अपूर्ण कामांची संख्या-05 |
100 दिवस कार्यक्रमाची वर्तमान स्थिती :- 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची वर्तमान स्थिती (पीडीएफ 395 केबी)